महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा - २०२५
जाहिरात क्रमांक: ०१४/२०२६ | दिनांक: २० मे, २०२६
१. महत्त्वाच्या तारखा (Important Dates)
| तपशील |
तारीख / वेळ |
| ऑनलाईन अर्ज अवधी |
२१ मे, २०२६ (१४:००) ते ०४ जून, २०२६ (२३:५९) |
| शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक |
०४ जून, २०२६ (२३:५९) |
| SBI चलन प्रत घेण्याचा दिनांक |
०६ जून, २०२६ (२३:५९) |
| चलनाद्वारे शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक |
०८ जून, २०२६ (बँकेच्या वेळेत) |
| मुख्य परीक्षा दिनांक |
रविवार, १२ जुलै, २०२६ |
परीक्षा जिल्हा केंद्रे: अमरावती, छत्रपती संभाजी नगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई व पुणे.
२. पदसंख्या (Vacancy Details)
| पदाचे नाव |
पदे |
| उद्योग निरीक्षक (Industries Inspector) |
०९ |
| कर सहायक (Tax Assistant) |
७३ |
| तांत्रिक सहायक (Technical Assistant) |
०४ |
| दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क |
१२५ |
| लिपिक-टंकलेखक (Clerk-Typist) |
१६७३ |
| एकूण पदे (Total Vacancies) |
१८८४ |
३. परीक्षा शुल्क (Exam Fee)
- अमागास (Open): रु. ५४४/-
- मागासवर्गीय / आ.दु.घ. / अनाथ / दिव्यांग: रु. ३४४/-
४. पात्रता व अर्हता (Eligibility)
- वयोमर्यादा गणण्याचा दिनांक: १ फेब्रुवारी, २०२६ (किमान १८/१९ वर्षे, कमाल: अमागास ३८ वर्षे, मागासवर्गीय ४३ वर्षे).
- शैक्षणिक अर्हता:
- उद्योग निरीक्षक: अभियांत्रिकी पदवी (स्थापत्य व संबंधित विषय वगळता) किंवा तंत्रज्ञान पदविका, किंवा विज्ञान पदवी.
- इतर पदे: मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी. मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य.
- टंकलेखन वेग (Typing Speed):
- कर सहायक: मराठी किमान ३० शप्रमि आणि इंग्रजी किमान ४० शप्रमि.
- लिपिक-टंकलेखक: मराठी किमान ३० शप्रमि किंवा इंग्रजी किमान ४० शप्रमि.
- शारीरिक पात्रता (केवळ दुय्यम निरीक्षक पदासाठी):
- पुरुष: उंची किमान १६५ सेंमी, छाती किमान ७९ सेंमी (फुगवून ५ सेंमी जास्त).
- महिला: उंची किमान १५५ सेंमी, वजन किमान ५० किग्रॅ.
५. परीक्षा योजना (Exam Scheme)
संयुक्त मुख्य परीक्षा एकूण ४०० गुणांची असेल (वस्तुनिष्ठ बहुपर्यायी):
- पेपर १ (संकेतांक १०६४): मराठी (५० प्रश्न) व इंग्रजी (५० प्रश्न) - एकूण १०० प्रश्न, २०० गुण (१ तास).
- पेपर २ (संकेतांक १०६५): सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी - एकूण १०० प्रश्न, २०० गुण (१ तास).
नकारात्मक गुणदान (Negative Marking): प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी २५% किंवा १/४ गुण वजा करण्यात येतील.
६. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया (How to Apply)
- आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या: mpsconline.gov.in.
- तुमचे प्रोफाईल / KYC अद्ययावत करा.
- पात्रतेनुसार योग्य संवर्ग निवडा व लिपिक-टंकलेखक पदासाठी पंसतीक्रम (Preferences) नोंदवून अर्ज सबमिट करा.
- आवश्यक कागदपत्रे PDF फॉरमॅटमध्ये (५० KB ते ५०० KB) अपलोड करा.
- परीक्षा केंद्र निवडा आणि विहित शुल्काचा ऑनलाईन किंवा चलनाद्वारे भरणा करा.